कलावंती दुर्ग by pravin ide
कलावंतीण दुर्ग
हा मुंबई-पुणे गतिमार्गा वरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्यारांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे.
गडावर पोहचायचे कसे :
हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4)शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे.
कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यासजेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. आणि दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

‘कलावंतीण दुर्गाचा इतिहास :
कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचेखूप जिव्हाळयाचे नाते आहे.
ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
कलावंतीण दुर्गनिसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.
आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे.
जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.
पनवेल आणि कर्जत दरम्यान जून्या मुंबई –पुणे महामार्गावरून जात असताना प्रबळगड दिसतो.
प्रबळगडाच्या परिसरात उल्हास नदी,
पाताळगंगा नदी,
माणिकगड,
कर्नाळा,
इर्शाळगड आणि जवळच माथेरानचा डोंगर आहे. मुंबई पुणे महामार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडकडे पाहिल्यास प्रबळगड म्हणजे महादेवाची पिंड आणि कलावंतीण दुर्ग म्हणजे समोर बसलेला नंदी असे दृश्य दिसते.
माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त प्रबळगड आणि कलावंतीणदुर्गच्यामध्ये होतो.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ यागावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते.

शेडुंग मार्गे :
मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल – पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.माथेरान –
प्रबळगड मार्गे :
माथेरानजवळ असलेल्या पिसरनाथ मंदिराजवळून आकसरवाडी गावामधून प्रबळगडचा डोंगर चढता येतो. प्रबळगडावर गिर्यारोहणासाठी माथेरान मार्गे येणारे पर्यटक याच वाटेनेयेतात.
शेंदुंग मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते. परंतु प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहण्यासाठी मुक्कामी जाणाऱ्या गिरीप्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते.
माची प्रबळ गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या परिसरात देखील गिरीप्रेमी तंबू ठोकून राहतात.

Comments
Post a Comment