कुलंग गड by pravin ide
कुलंग गड
नाव कुलंग गड
उंची१४७० मीटर
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी अवघड
ठिकाण अहमदनगर,
महाराष्ट्रजवळचे गावइगतपुरी, कुरंगवाडी, आंबेवाडीडोंगररांग कळसुबाईची रांगसध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {
स्थापना भौगोलिक स्थान
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक कळसुबाईची रांग ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे.कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते.कसे जाल ?कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गावआहे.
इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावरइंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो.माहितीकळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे.
त्यामुळे या रांगेतीलकिल्लेदुर्गम असून यांची चढाई चढणार्याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते.
पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते.
पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे.
या दमछाक करणार्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.

Comments
Post a Comment