Skip to main content
अमृतेश्वर मंदिर bhandardara
रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते.
रतनवाडी येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते.रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.मंदिराची रचनामंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ वगर्भगृहअसा या मंदिराचा तलविन्यास आहे.
[१]मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावरवर्तुळाकृती आहेत.
अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतरसोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.राष्ट्रीय संरक्षित स्मारकया मंदिराला४ मार्च,इ.स. १९०९रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यातआले.
Comments
Post a Comment