Kalsubai trek

महाराष्ट्रातील अभयारण्ये मुख्यपानकळसूबाई – 


रीश्चंद्रगड अभयारण्यसह्याद्रीपर्वत रांगेतील महाराष्ट्रामधीलसर्वोच्च शिखरकळसूबाई आणि नाणेघाटाच्या सानिध्यातीलहरीश्चंद्रगड यांच्या आसपासचा सुमारे ३६१.७१चौ.कि.मी चा डोंगराळ, दुर्गम परिसर महाराष्ट्र शासनाने इ.स१९८६ मध्ये अधिघोषित केला आहे. मुळा, प्रवरा, आढळा,म्हाळुंगी या नद्यांचे खोरे आणि उत्तुंग अशीगिरी शिखरे असा हा अप्रतिम सृष्टी सौंदर्यानेनटलेला परिसर असून, इ.स १९१० ते १९२४ या काळात उभारण्यात आलेलेभंडारदरा धरण आणि या धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक हाजलाशय आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अनेक देशी –विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतो. येथे पक्ष्यांचा अधिवासही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अहमदनगरजिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला विपुलजैवविविधता लाभली आहे.या क्षेत्रात दक्षिण उष्णकटीबंधीय आर्द मिश्रपानगळीची वने, काटेरी वने तरकाही भागात सदाहरित वने अशी वनांचीविविधता येथे आढळून येते. 

या अभयारण्यात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा,कुंभल, कुडल, सिरस, पांगारा, कराप, आवळा, अशिंद, बेहडा, खारवेल, कळंब,सावर, सादडा, अर्जुन, धामण, अशी नानाविविध वृक्षसंपदा येथेआढळते.या अभयारण्यात बिबळे, रानमांजरी, ताडमांजर, मुंगुस,तरस, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, भेकर,ससा, सांबर, शेकरू, घोरपड हेवन्यप्राणी देखील येथे बघायला मिळतात. विविधप्रजातीचे साप वसरडे सुद्धा येथे दिसून येतात.येथील जलाशय परिसरात करकोचे, बगळे, शराटीअसे पाणपक्षी देखील येथे निदर्शनासयेतात.भंडारदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यापर्यटन संकुलात पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात तसेच वनविभाग वसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात तसेचवनविभाग व सार्वजनिकबांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पर्यटकांच्या निवासाची सोयउपलब्ध आहे. तसेच भंडारदरा धरण परिसरात खासगी रिसॉर्टसदेखील आहेत.अभयारण्याच्याच परिसरात रतनगड, मदनगड,अलंग, कुलंग, बिजनगडपट्टा, कोंबड किल्ला हे ऐतिहासिक गड-किल्ले तररंधा फॉल, अम्ब्रेला फॉल हे मोठे धबधबे देखील येथे आहेत.कळसूबाई – हरीश्चंद्रगड अभयारण्याच्यापर्यटनासाठी ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ उत्तम आहे.संपर्क:

१) वनपरिक्षेत्र अधिकारी,कळसूबाई–हरीश्चंद्रगड अभयारण्य, भंडारदरा.

२) उपवनसंरक्षक(वन्यजीव) काळे भवन, प्लॉट नं ७१५१४.एच.पी.टी कॉलेज समोर, कॉलेज रोड, 

नाशिक –४२२००५.दूरध्वनीक्र : (०२५३) २३१७०८२,२३१७११४.कसे जाल ?रस्त्याने: 

मुंबई – नाशिक राष्ट्रीयमहामार्गावर घोटी येथून भंडारदरा येथे जाण्यासाठीफाटा आहे.मुंबई - (१८५ किमी), नाशिक - (७२किमी)रेल्वेने: मध्य रेल्वे मार्गातीलनजीकचे रेल्वे स्थानक घोटी -( ३५किमी. )विमानाने: जवळचे शहर – नजीकचेविमानतळ मुंबई = (१८५ किमी.) —

Comments

Popular Posts